कुतुहल
-
फुग्यांचा खेळ आणि बर्नोलीचा नियम – भाग 1

मुलांनो, प्रथम एका मजेशीर प्रयोगाबद्दल बघूया. खालील दोन चित्रे निरखून बघा. चित्र 1 मधे वजनाने अत्यंत हलके असे दोन फुगे शेजारी, साधारण सात-आठ सें.मी.चे अंतर ठेऊन बांधले आहेत व त्यांच्यामधून जरा जोरात फुंकर मारण्यासाठी मुलगा उभा आहे. त्याने अगदी जोरात फुंकर मारली तर तुमचा काय अंदाज आहे, फुगे किती दूर जातील? अरेच्या, दुसऱ्या चित्रात काय दिसतंय? फुगे…
-
बर्नोलीचा नियम – भाग 2

मुलांनो, मागील भागांत आपण बरनॉलीचा “वाहणाऱ्या हवेची (किंवा पाण्याची) गती वाढली तर तिथल्या हवेचा (किंवा पाण्याचा) दाब कमी होतो.” हा नियम पाहिला. त्याची थोडी उजळणी करूया आणि मग आणखी काही उदाहरणे बघुया. खालील आकृती बघा. ह्या आकृतीत दाखवलेल्या पाईपमधून पाणी वाहत आहे. पाईपमधून जाणाऱ्या पाण्याच्या वहनाचा दर (Flow Rate) पाईपभर समान असतो. म्हणजेच पाईपच्या काटछेदाचे (Cross-section) क्षेत्रफळ…
-
पाण्याचे फुगे का होत नाहीत?

नुसत्या पाण्याचे फुगे करायचा प्रयत्न कधी केलाय का तुम्ही?…. बघा करून, जमतंय का? नाही ना जमत नुसत्या पाण्याचे फुगे? का बरं होत असेल असं? ते आपण पुढे बघूया. पण साबणाच्या पाण्याचे फुगे मात्र तुम्हाला नक्कीच माहित आहेत, ते तुम्ही खूपवेळा केले असतील आणि हे फुगे हवेत सोडायला, मित्र-मैत्रीणींवर उडवायला तुम्हाला खूप मजा येत असेल. आता…
-
वृक्ष वाचवा

मुलांनो हल्ली जी अफाट वृक्षतोड होते आहे, ती होण्याचं एखाद प्रमुख कारण तुम्हाला माहिती आहे का? या वृक्षतोडीचे कारण समजल्यावर तुम्हाला आपल्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल करावासा वाटेल. वृक्षतोडीचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कागद बनवणं. सुमारे 30% टक्के वृक्षतोड ही केवळ ह्याच कारणासाठी होत असते. कागद हा प्रामुख्यानं पाम किंवा निलगिरीच्या झाडापासून बनवला जातो. एका…
-
पोहता येत नाही? नो प्रॉब्लेम!

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्या होत्या शाळेत शिक्षक आणि विदयार्थ्यांच्या गप्पा चालल्या होत्या. सुट्टीत काय काय केलं, नवीन काय शिकलात वगैरे. हरीने पोहायला शिकल्याचं सांगितलं. त्यावर यश म्हणाला, “सर, मी नाही शिकणार कधी पोहायला. मला बुडण्याची फार भीति वाटते”. तेव्हा शिक्षक म्हणाले, “यश, आज तुला पोहण्यासाठी असे एक गंमतशीर ठिकाण सांगतो की जिथे तू पोहायला…
-
उंबरफुलाची गोष्ट

मुलांनो, तुम्ही उंबर किंवा पिंपळवृक्षाला फुलं आलेली पाहिलीत का? उंबर किंवा औदुंबर, वड, पिंपळ, अंजीर, हे वृक्ष “फायकस” किंवा “फिग” ह्या प्रजातीतील विविध जातीत मोडतात. ह्या वृक्षांना काही ऋतुंमध्ये छोटी, गोल,मऊ लालसर “फळं” लागलेली तुम्ही पाहिली असतील, जी पिकल्यावर जमिनीवर पडतात. मग फळं आहेत पण फुलं दिसत नाहीत असा प्रश्न येतो का मनात? नक्कीच हा…
All diagrams, pictures, tables etc. are from websites on Internet. We are thankful to all these sources.
Vidnyanvahini is a Non-Governmental Organisation (NGO) and this entire write up is for students, teachers and general public, free of charge.
IT IS NOT FOR ANY COMMERCIAL USE.
