कुतुहल

  • भोवरा कसा फिरतो?

    मुलांनो, तुमच्या लहानपणी कोणती खेळणी तुम्हाला आवडत होती? कदाचित व्हिडीओ गेम्स, क्रिकेटचे बॉल-बॅट वगैरे असतील. पण तुमच्या आजोबांना हा प्रश्न तुम्ही विचारला तर ते त्यांच्या आवडीचा एक खेळ नक्की सांगतील, तो म्हणजे भोवरे फिरवणे. आताचे भोवरे खूप वेगवेगळ्या प्रकारचे, रंगीत नक्षीचेही असतात. भोवऱ्याला दोरा गुंढाळून तो बोटांनी विशिष्टप्रकारे जमिनीवर सोडला आणि छान फिरू लागला की…

    Read More ~ पूर्ण वाचा

  • मेंदू- भाग-२

    मुलांनो, मानवी मेंदूवरील पहिल्या लेखात आपण मेंदूविषयी काही माहिती बघितली, आता ह्या लेखात त्याविषयी आणखी थोडे जाणून घेऊया. 1) पृथ्वीतलावर आजपर्यंत मानवाला सर्वात गुंतागुतीची वाटलेली गोष्ट म्हणजे आपला मेंदू! 2) आपल्या शरीरात वेगवेगळ्या कामांसाठी मेंदूमधे वेगवेगळे विभाग असतात. ह्या कामांचे प्रकार प्रचंड असतात. उदाहरणार्थ – विचार करणे, शिकणे, निर्मिती करणे, भावनांची जाणीव होणे, संयम इत्यादींपासून…

    Read More ~ पूर्ण वाचा

  • दिड किलोची अद्भूत बाब!

    मुलांनो, लेखाच्या नावावरून हा काय लेख असेल ते तुम्ही ओळखूच शकणार नाही. मग तुम्ही विचार करू लागाल. पण विचार करायला तुम्ही काय वापरणार? डोकं? नाही हो, तुम्ही त्यातला मेंदू वापरणार! ज्याच्या सहाय्याने तुम्ही विचार करू लागता ना, तीच बाब (matter) आपण बघणार आहोत. लक्षावधी मज्जातंतूं पेशींनी बनलेला आणि त्यांच्या लक्षाधीलक्ष जोडण्या करून त्याद्वारे निरोपांचे दळणवळण…

    Read More ~ पूर्ण वाचा

  • मुंग्यांचे जग

    मुग्यांवर अमेरिकेत झालेल्या संशोधनात असे आढळून आले की पृथ्वीवर माणूस येण्याआधी सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वीच डायनॉसॉर नष्ट झाले. मात्र आश्चर्य म्हणजे डायनॉसॉरच्याच काळात असणारी किटकाची एक जात आजच्या काळातही टिकून आहे. हा किटक म्हणजे मुंगी! ह्या जगात सततचे बर्फाळ प्रदेश सोडून बाकी जगभरात मुंग्या आढळतात आणि त्यांच्या सुमारे 12,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. प्रत्येक प्रजातीच्या…

    Read More ~ पूर्ण वाचा

  • इंद्रधनुष्य: बरेच काही – भाग 2

    मुलांनो, मागील लेखात आपण प्राथमिक इंद्रधनुष्य (Primary rainbow) कशामुळे दिसते हे पाहीले. आता आपण दुय्यम इंद्रधनुष्य (Secondary rainbow) कशामुळे दिसते ते बघूया. वरील डावीकडच्या फोटो 1 मधे दिसते आहे त्याप्रमाणे, प्राथमिक इंद्रधनुष्याच्या थोड्या वरच्या बाजूला कधीकधी फिकट असे दुय्यम इंद्रधनुष्यही आपल्याला दिसते. ह्या लेखात ह्या इंद्रधनुष्यांविषयी आपण जास्त माहिती करून घेऊया. आता आकृती 1 नीट…

    Read More ~ पूर्ण वाचा

  • इंद्रधनुष्य: बरेच काही – भाग 1

    मुलांनो, आपण आकाशात कधीकधी सप्तरंगी, सुंदर कमानीचे मनमोहक इंद्रधनुष्य पाहतो (फोटो 1). तुम्हाला असाही अनुभव असेल की आपल्याला इंद्रधनुष्य धुक्यामधे, धबधब्याच्या पाण्यावर (फोटो 2), कारंज्याच्या पाण्यावर (फोटो 3), काही वेळा तर तळ्यातल्या पाण्यावरही ते दिसू शकते. अशा कुठल्याही इंद्रधनुष्याला कोणी कधी स्पर्श करू शकेल का? अर्थातच नाही. कारण आकाशात किंवा कुठेही दिसणारे इंद्रधनुष्य हे पूर्णपणे…

    Read More ~ पूर्ण वाचा

All diagrams, pictures, tables etc. are from websites on Internet. We are thankful to all these sources.
Vidnyanvahini is a Non-Governmental Organisation (NGO) and this entire write up is for students, teachers and general public, free of charge.
IT IS NOT FOR ANY COMMERCIAL USE.

Scroll to Top