असे कां आणि कसे?

“असे कां आणि कसे?” हे दोन प्रश्न अगदी लहानपणापासूनच आपल्या मनात सतत रूंजी घालत असतात. आपण त्यांचा पाठपुरावा करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला की अनेक संकल्पना आपल्याला उलगडत जातात. वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. हाच खरा विज्ञान विषयाचा अभ्यास!

भौतिकशास्त्र (Physics)
  • कार्य आणि ऊर्जा

    एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता जर त्या वस्तूचे काही विस्थापन घडून येत असेल तर कार्य झाले असे म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. वस्तूचे विस्थापन कधी बलाच्या दिशेने तर कधी बलाच्या विरुद्ध दिशेने होते. काही वेळा तर बल प्रयुक्त करून सुद्धा वस्तूचे विस्थापन होत नाही. वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने झाले तर त्यावेळी झालेल्या कार्याला धन कार्य म्हणतात.…

    Read More

  • घनता व प्लावक बल

    मुलांनो, आपण पदार्थाची (किंवा वस्तूची) घनता म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊया. समजा आपण एखादा लाकडी ठोकळा घेतला, तो काट्यावर तोलला तर त्याचे वस्तुमान (mass) किती आहे ते आपल्याला कळेल. आणि ह्या ठोकळ्याच्या एकूण आकाराचे मोजमाप केले तर त्याचे आकारमान (volume) किती आहे ते आपल्याला काढता येईल. ह्या दोन गोष्टींवरून ठोकळ्याची घनता तुम्हाला काढता येते, होय ना? वस्तूचे ’वस्तुमान / आकारमान’…

    Read More

  • न्यूटनचे गतीविषयक नियम – उजळणी

    1. गतीमानता.2. भौतिक राशी.3. विस्थापना, वस्तुमान, काल.4. साधित राशी.5. गतीविषयक सूत्रे.6. सदिश व आदिश राशी.7. संवेग.8. न्यूटनचा जडत्वाचा पहिला नियम.9. घर्षणबल.10. जडत्व.11. न्यूटनचा दुसरा नियम.12. जडत्व चर्चा.13. घर्षणबल चर्चा.14. न्यूटनचा गुरुत्वबलाचा नियम.15. न्यूटनचा तिसरा नियम.16. तिन्ही नियमांचे परस्परावलंबन. आज आपण हालचाल-गतीमानता – motion या नैसर्गिक घटिताचा (phenomenon) अभ्यास करणार आहोत. यासाठी आपल्याला उपजतपणेच (intuitively) माहिती…

    Read More

  • विद्युतधारेचे परिणाम व उपयोग

    विद्युतधारेचे परिणाम व उपयोग (Effects and uses of Electricity) तुम्ही आमचा यापूर्वीचा “विद्युत – काही संकल्पना” हा लेख वाचला असेलच. तसेच तुम्ही ओहमच्या नियमाचा Video सुद्धा बघितला असेल. त्यामध्ये आपण विद्युतभार, विद्युतप्रवाह (विद्युतधारा) इत्यादी संकल्पना बघितल्या होत्या. विद्युतधारा म्हणजे वाहकातून (परिपथातून) खो खो देत वाहणारे इलेक्ट्रॉन्स, जे जास्त विभवाकडून कमी विभवाकडे वाहतात. हा विद्युतप्रवाह म्हणजेच…

    Read More

  • न्यूटनचे गतीविषयक नियम

    न्यूटनचे गतीविषयक नियम मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की, मागील कित्येक शतकांपासून माणूस आपल्या अवतीभोवतीचं जग पहात आला आहे, आजूबाजूच्या साध्यासुध्या हालचालींपासून ते इतर सर्व प्रकारच्या हालचाली न्याहाळत आला आहे. आपणही आजपर्यंत तसंच करत आलो आहोत, म्हणजे नुसतंच बघत आलो आहोत. पण ह्या लेखातून तुम्हाला हे कळेल की, ज्यांच्या मनात ह्या साध्या वाटणाऱ्या हालचालींबद्दल कुतुहल निर्माण…

    Read More

  • ओहमचा नियम

    नमस्ते मुलांनो, तुम्ही ह्यावर्षी विद्युतचा एक महत्वाचा प्रयोग, विद्युतचा पायाच म्हणाना, पुस्तकात वाचलाच असेल. पण तो प्रयोग करून पहाण्याचं किती आणि काय महत्व आहे, हे माहीत आहे का तुम्हाला? असं म्हणतात ना, ‘कुठलीही गोष्ट आपण स्वत:च्या हाताने करून पाहिली की ती आपल्याला चांगली कळते.’ आणि ह्याचा अनुभव नक्कीच येईल तुम्हाला हा प्रयोग केल्यावर! अर्थात प्रयोग…

    Read More

  • विद्युत – काही संकल्पना

    विषयप्रवेश असं म्हटलं जातं कीं भौतिकशास्त्र हे उर्जेसंबंधीचं शास्त्र आहे. Physics is a ‘Science of Energy’. खरं आहे. तुम्हाला कोणकोणत्या उर्जा किंवा उर्जेचे प्रकार माहित आहेत? तुम्ही अगदी पटापट सांगाल कीं गतिज, स्थितीज, उष्णता, प्रकाश, विद्युत ह्याशिवाय रासायनिक, लवचिकता, गुरुत्वाकर्षण वगैरे. ह्यातील कांहीं उर्जा गतीमुळे प्राप्त होतात तर कांहीं स्थितीमुळे. आपण आज अशा एका उर्जेचा…

    Read More

  • गुरुत्वाकर्षण

    प्रस्तावना नमस्कार मुलांनो, तुम्हाला माहितच आहे की आपल्या पृथ्वीवरील सर्व नद्या जमिनीवरूनच वाहतात, समुद्राचे पाणी जमिनीवरच असते. पृथ्वीच्या भोवती कायम वातावरण असते. आपण तोंड वर करून बाटलीतले पाणी ओतून पिऊ शकतो. पृथ्वी सूर्याभोवती तर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. अशा आणखी कितीतरी गोष्टी! पण असं का बरं होत असेल? जरा विचार करूया. येतय का लक्षात ह्यामागचं कारण?…

    Read More

🧪 रसायनशास्त्र (Chemistry)
  • धातू व अधातूचे रासायनिक गुणधर्म

    आपण धातू व अधातूंचे भौतिक गुणधर्म बघितले. आता आपण रासायनिक गुणधर्म बघूया. धातू इलेक्ट्रॉन देणारे असतात. धातूंची इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा देण्याची क्षमता जेवढी अधिक, तेवढा धातूगुण अधिक. अति क्रियाशील धातूपासून अक्रियाशील धातूपर्यंत धातूंच्या क्रियाशीलतेत तफावत आढळते क्रियाशीलते प्रमाणे धातूंची क्रमवारी लावली आहे. त्याला धातूंची क्रियाशीलता श्रेणी म्हणतात. धातूंची क्रियाशीलता श्रेणी : वैज्ञानिकांनी धातूंची क्रियाशीलता श्रेणी तयार केली…

    Read More

  • धातू व अधातू

    वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा शोध लागत गेला तसे त्यांचे वर्गीकरण करणे आवश्यक बनले. अगदी पहिल्या वर्गीकरणामध्ये मूलद्रव्यांची विभागणी धातू आणि अधातू अशी केली गेली. अजूनही हे वर्गीकरण आवर्तसारणीत ठळकपणे दिसते. 92 नैसर्गिक मूलद्रव्यांमध्ये 70 मूलद्रव्ये धातूंची आहेत. या आवर्तसारणीत वेगवेगळे रंग उपगट दाखवायला वापरले आहेत. धातूंमध्ये ही उपगट आहेत आणि अधातूंमध्येही आहेत. पण धातू सगळे डावीकडे आणि…

    Read More

  • मूलद्रव्यांची आवर्तसारणी (भाग – 2)

    आधीच्या भागात आपण बघितले की आता मूलद्रव्यांची मांडणी त्याचा अणुअंक आधारभूत धरून केली आहे. त्यामुळे ती अणूच्या इलेक्ट्रॉन संरुपणावर सुद्धा आधारलेली आहे. सर्व 118 मूलद्रव्यांचे संरूपण लिहिल्यावर मूलद्रव्यांतील अणूंचे अणुअंक, इलेक्ट्रॉन संरूपण व रासायनिक गुणधर्म यांचा विचार करून पुढील मांडणी तयार होते. हीच ‘मूलद्रव्यांची आधुनिक आवर्तसारणी’. या आवर्तसारणीचे नीट निरीक्षण करून काही महत्वाच्या मुद्याची नोंद करूया.…

    Read More

  • मूलद्रव्यांची आवर्तसारणी (भाग – 1)

    मुलांनो, तुम्ही तुमच्या आजूबाजूला नजर टाकलीत तर काय दिसते? खूप वेगवेगळ्या गोष्टी, नाही का? त्याची यादी करता येईल का? मला तर वेगवेगळी झाडे, काही पक्षी, प्राणी, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या दिसत आहेत. घरात सुद्धा लाकडी फर्निचर, काही लोखंडी वस्तू, तांब्या-पितळेची, स्टीलची भांडी, काचेचे ग्लास, कप दिसतात. तुमची यादी वेगळी आणि मोठी सुद्धा असू शकेल. या सर्व…

    Read More

  • अणू संरचना (भाग – 2)

    आमची खात्री आहे की तुम्ही ‘अणुसंरचना – भाग -१’ नक्कीच वाचला असेल. इ.स. पूर्वी ५०० वर्षांपासून ते अगदी इ.स. १९१३, म्हणजे बोरने सांगितलेल्या अणूच्या या रचनेपर्यंत (Atomic Structure), काही शास्त्रज्ञानीं केवळ तर्क करून (Logical Thinking) परंतु नंतर अनेकांनी प्रयोगात्मक अभ्यास करून (Experimental Study) अणूंच्या वेगवेगळ्या प्रतिकृती मांडल्या. महत्वाचे म्हणजे आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन म्हणजेच, ‘…

    Read More

  • अणू संरचना (भाग – 1)

    अणूपासून ब्रह्मांडाएवढा आपल्या मानवी शरीराचे कार्य कसे चालते त्याचे बरेचसे बारकावे आपल्याला माहित झाले आहेत. शरीर वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींनी बनले आहे परंतु DNA त्यातील महत्वाची भूमिका पार पाडत असतो. तसेच आपले हे सुंदर, विविधतेने व वैचित्र्याने नटलेले परंतु काही विशिष्ट नियमाने चालणारे विश्व केव्हा व कसे निर्माण झाले याचे कुतुहल मानवी मनाला नेहमीच सतावत आले…

    Read More

  • द्रव्याचे स्वरूप (भाग 2)

    बाबा, द्रव्याचे दोन प्रकाराने वर्गीकरण करतात. भौतिक स्थितीवर आधारीत वर्गीकरणानुसार द्रव्याचे स्थायू, द्रव, वायू हे तीन प्रकार पडतात. त्यांची माहिती द्रव्याचे स्वरूप भाग १ मध्ये तुम्ही मला दिलीत. आता द्रव्याचे, दुसऱ्या प्रकाराने पडणाऱ्या प्रकारांची माहिती देता कां? संजू, फुलांचे गट तयार करताना तू दुसरा प्रकार सांगितलास तो म्हणजे फुलांच्या प्रकारानुसार. कारण गुलाबाच्या फुलांची रचना, त्याचे…

    Read More

  • द्रव्याचे स्वरूप (भाग 1)

    अरे संजू, काय मस्त वास सुटला आहे रे उदबत्तीचा! अरे काय रे, किती हा पसारा घालून ठेवला आहेस खोलीभर! किती वस्तू जमवल्या आहेस आणि वजन काटा का घेतलायस? काय करतोस काय? अहो बाबा, काही नाही. जरा मी प्रयोग करून बघतोय. आम्हाला आमच्या टीचर नेहमी सांगतात की, प्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही विज्ञान शिकलात तर ते तुम्हाला लवकर…

    Read More

  • ओळख रसायनशास्त्राची

    नमस्कार मुलांनो,‘रसायनशास्त्र’ असं भारदस्त नाव घेतलं की तुमच्या डोळ्यासमोर प्रयोगशाळा व त्यात पांढरा कोट घालून काहीतरी करण्यात दंग असलेली माणसं असं येतं का? आपला रोजचा रसायनांशी व त्याच्या शास्त्राशीही संबंध येत असतो. तुमची ओळख याच्याशी आहेच. आता दोस्ती करायचीय. आई सकाळी शेगडी पेटवते की नाही, दुधाला विरजण लावून दही करते, या सगळयात हेच दडलेलं आहे.…

    Read More

🌿 जीवशास्त्र (Biology)
  • सजीवांच्या पोषण पद्धती

    आपल्या अवतीभोवती अनेक सजीव आहेत. सगळे सजीव सूक्ष्म पेशींनी बनलेले असतात हे आपल्याला माहीत आहे. या पेशींची सतत झीज होत असते. स्वतःचा जीव जगवणे ही सर्व सजीवांची अंत:प्रेरणा असते. त्यासाठी ही झीज भरून निघणे गरजेचे असते. यासाठी हवा, पाणी, अन्न यांची गरज असते. या गरजा भागल्या की दुसरी अंत:प्रेरणा (Instinct) असते स्वतःचा वंश टिकवण्याची. म्हणून…

    Read More

  • आपत्ती व्यवस्थापन

    आपल्याला त्रासदायक अशा घटना अचानक आकस्मिकपणे घडल्या तर आपण त्याला काय म्हणतो मुलांनो, याचे उत्तर द्याल का तुम्ही? बघा हं! विचारपूर्वक बोला. हा बरोब्बर. कुणी सांगितलं? उत्तर आहे. – “संकट”! ही संकटे कधी सांगून येत नाहीत. तसेच ती भयंकरच असतात, धोकादायक असतात. ती अचानकपणे ओढवतात, म्हणून त्यांना आपण आपत्ती असे म्हणतो. आपत्ती व्यवस्थापन फार प्राचीन…

    Read More

  • पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान

    मुलांनो आपण सभोवताली बघतो तेव्हा प्रामुख्याने नजरेत काय भरते आपल्या? सजीव आणि निर्जीव जगात आपण वावरतोय असं वाटतं ना? सजीव म्हणजे प्राणी, पक्षी, वनस्पती आणि आपण मानवसुद्धा पेशींचे बनले आहोत हे तुम्ही जाणताच. पेशी म्हणजे सजीवांचे “रचनात्मक व कार्यात्मक एकक असते.” हे तुम्हाला ठाऊक आहेच. तसंच आजच्या कॉम्पुटर व स्मार्टफोनच्या काळात तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी हाही…

    Read More

  • प्राण्यांचे वर्गीकरण (भाग – ४)

    प्राणी जगत हे दोन उपसृष्टीत विभागलेले आहे हे आपण भाग ३ मध्ये बघितलयं. कुठल्या ह्या दोन उपसृष्टी आहेत? (१) असमपृष्ठरज्जू (Non chordates) (२) समपृष्ठरज्जू (Chordates) उपसृष्टी असमपृष्ठरज्जू मध्ये पृष्ठरज्जू (Notochord) कल्ला विदरे जीवनाच्या कुठल्याही अवस्थेत नसतात तर उपसृष्टी समपृष्ठरज्जूमध्ये नोटोकॉर्ड, कल्ला विदरे जीवनाच्या कुठल्याना कुठल्या अवस्थेत असतातच. (उदा. आपण मानवच आहोत. मानवात गर्भावस्थेत नोटोकॉर्ड व कल्लाविदरे…

    Read More

  • प्राण्यांचे वर्गीकरण (भाग – ३)

    पृथ्वीवर असंख्य जीव अस्तित्त्वांत आहेत. ते किती आहेत? साधारण ८७ लक्ष. ह्या ८७ लक्ष सजीवांपैकी २५%च सजीवांची आपल्याला ओळख आहे. आपण सर्व प्राण्यांचा अभ्यास कसा करणार? त्यासाठी वर्गीकरण आवश्यक आहे. हे भाग १ मध्ये समजून घेतले. भाग २ मध्ये निरनिराळ्या शोधांमुळे वर्गीकरणाच्या पद्धती कशा विकसित होत गेल्या हे आपण शिकलो. त्या कोणत्या? :- (१) कृत्रिम…

    Read More

  • प्राण्यांचे वर्गीकरण (भाग – २)

    लिनीयसने साध्या सरळ सोप्या, बाह्यगुणांच्या आधारे केलेल्या वर्गीकरणात काही कमतरता राहून गेल्या आहेत. अत्यंत सोपा वर्गीकरणाचा प्रकार असल्यामुळे आजही तो वापरला जातो. तरीही त्यात त्रुटी आहेतच. त्रुटी रॉबर्ट हूक ह्या इंग्लिश शास्त्रज्ञाने १६६५ मध्ये सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला. त्यातून त्याने बुचाच्या खोडाचे पातळ काप घेतले. त्यात त्याला मधाच्या पोळ्यासारखे काहीतरी दिसले. ह्या पोळ्याच्या कप्प्यांना त्याने Cell…

    Read More

  • प्राण्यांचे वर्गीकरण (भाग – १)

    प्राणिसृष्टी बालपणापासून आपण अनेक प्राणी बघत असतो. लहानपणी आई घास भरवताना हा घास काऊ चा, हा घास चिऊ चा करून कावळा चिमणीची ओळख करून देते. नंतर कित्येक प्राण्यांची ओळख पुढच्या जीवनांत होतेच. अशी ओळख होतांना लक्षांत येतं की प्रत्येक प्राणी त्याच्या रूपाने वेगळा आहे. त्याला स्वत:ची अशी जीवनपद्धती आहे. त्याची स्वत:ची अशी वैशिष्ठ्ये आहेत. ह्यालाच…

    Read More

  • वनस्पतींचे वर्गीकरण

    मुलांनो, आपण सर्वजण पृथ्वीवर राहतो. काय काय आहे बरं पृथ्वीवर? बरोबर, डोंगर, नद्या, समुद्र इ. आहे. अरे, शिवाय आपण स्वतः नाही का? म्हणजे आपल्या सारखी माणसे आहेत, यापुढे तुम्ही लगेच सांगाल पशु -पक्षी, झाडे, झुडपे, जलचर वगैरे. हे सर्व पाहिल्यावर मला सांगा अशा सर्व गोष्टींचे दोन मुख्य भागात विभाजन करायचे म्हटले तर तुम्ही कसे कराल?…

    Read More

  • आनुवंशिकता व उत्क्रांती (भाग ३)

    प्रस्तावना मुलांनो, आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे सजीव असतात. पण पृथ्वीतलावर पहिला सजीव कोणता व कधी निर्माण झाला असेल? याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का?  सुमारे तीन ते साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे सजीव नव्हते. त्यापुढे कोणतेही आवरण नसलेले डी.एन.ए. किंवा आर.एन.ए. यांचे सूक्ष्म कण होते व वितंचकांमुळे (Enzymes) त्याचे द्विगुणन होत असावे असे…

    Read More

  • आनुवंशिकता व उत्क्रांती (भाग २)

    मुलांनो, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये चेहरा, केस, उंची, त्वचेचा रंग, शरीराची ठेवण इत्यादी बाबतीत तुम्हाला काही साम्य आढळते का? तसेच तुमच्या मित्रांच्या कुटुंबातही या प्रकारचे साम्य दिसते का? दिसते ना? म्हणजे एकाच कुटुंबातील माणसे ओळखता येतात. थोडक्यात काय? त्वचेचा रंग, डोळ्यांचा रंग, केसांचा रंग, उंची यासारखी शारीरिक गुणवैशिष्ट्ये तसेच आईवडिलांचे मधुमेह, दमा यासारखे आजार पुढच्या पिढीत…

    Read More

  • आनुवंशिकता व उत्क्रांती (भाग १)

    प्रस्तावना आपल्या घरात बाळाचा जन्म झाला की आपल्या सर्वांच्या, विशेषतः घरातल्या मोठ्या माणसांच्या मनात पहिला प्रश्न कोणता निर्माण होतो? बरोबर! बाळ-बाळंतीण सुखरुप आहेत ना? त्यांनतर येणारा दुसरा प्रश्न कोणता? अगदी बरोबर. बाळ कुणासारखे दिसते? साधारणपणे बाळाची ठेवण त्याची आई किंवा वडील यांच्यासारखी असते. त्यात कुणाला कधी-कधी बाळाच्या आजी-आजोबांचा सुद्धा भास होतो. म्हणजे बाळाचे गुण त्याच्याच…

    Read More

🔭 सामान्य विज्ञान (General Science)
  • ऑक्सिजन प्लॅन्टमधील ऑक्सिजन निर्मिती

    ऑक्सिजन (O2) अर्थात प्राणवायु: ऑक्सिजनचा शोध कार्ल शीले ह्या स्विडीश रसायन शास्रज्ञाने सन 1772 मधे लावला. त्याने पोटॅशियम नायट्रेट मधून ऑक्सिजन वेगळा केला. आपणा सर्वांना माहित आहे की, पृथ्वीवर जगण्यासाठी सर्व जीवांना प्राणवायु आवश्यक आहे. असा हा प्राणवायु आपल्याला हवेतून मिळत असतो. हवेत मुख्यत: पुढील घटक असतात – (नायट्रोजन) – 78%, (ऑक्सिजन) – 21%, इतर –…

    Read More

  • आपल्या सूर्यमालेतील ग्रह

    सूर्यापासून क्रमाने असणारे ग्रह ग्रहांचे तुलनात्मक आकार Jupiter (गुरू), Saturn (शनी), Earth (पृथ्वी), Venus (शुक्र), Mars (मंगळ), Mercury (बुध) आपल्या सूर्यमालेतील ग्रहांची वैशिष्ठ्ये विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, शेवटच्या पानावरील तक्ता वाचण्याआधी त्यातील 7 व्या उभ्या ओळीत दिलेला, ग्रहाचा ’पृथ्वीवरून भासणारा आकार’ ह्याचा अर्थ समजावून घेऊया. पृथ्वीवरून भासणारा आकार (Apparrent size from earth) तक्त्यामधे ’आर्क सेकंद’ ह्या एककात…

    Read More

  • Planets in our solar system

    Sequence of Planets from the Sun Relative sizes of the planets Characteristics of the Planets in our Solar System Dear students,Before you read the table given on next page, you may need an explanation of the term ‘Apparent size from earth’ given in the 7th column of the table. In this column you will find that apparent sizes are…

    Read More

  • ध्यासपर्व

    सोमवार दि. 10 ऑगस्ट 2020 च्या “लोकसत्तेतील” एक बातमी- “डॉ अन्वय मुळे, पाच वर्षात शंभराहून अधिक ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!” सहजिकच मानवाला संजीवन देणा-या संशोधक डॉ. ख्रिश्चन बर्नर्डचे नाव सर्व प्रथम डोळ्यासमोर आले. ह्रदयरोपणाची मानवावरील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया त्याने 3 डिसेंबर 1967 ला केली. त्या वेळी या घटनेचे वर्णन करताना “टाईम”ने त्यास मेडिकल सायन्स मधील एव्हरेस्ट…

    Read More

  • दूध एक पूर्णान्न

    अन्न, वस्त्र व निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा! तरी जन्माला आलेल्या बालकांची पहिली गरज असते ती प्रामुख्याने अन्नाची! मग इतर गरजा. ही अन्नाची गरज भागवण्यासाठी निसर्गानेच आईच्या दुधाची व्यवस्था जन्माबरोबरच केलेली असते. बालकाचे भरण आणि पोषण ह्याच दुधावर होते. मूल मोठे झाल्यावर आईचे दूध कमी पडते व मग त्याला बाहेरचे दूध दिले जाते. ह्या दुधातही…

    Read More

  • सूक्ष्म कणांचे तुलनात्मक आकार

    आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर काय दिसतं? सारं जग विविध गोष्टींनी भरलेलं आहे. झाडं, पक्षी, माणसं……….ही यादी तर वाढतच जाते. रात्री आकाशाकडे तुम्ही पाहिलं तर आपल्याला चंद्र, असंख्य तारे आणि दूरवरचे ग्रह दिसतील, त्यातले काही तर आपल्यापासून लाखो मैल दूर असतील! आणि तरीही आपण आपल्या डोळ्यांनी ते पाहू शकतो, हे किती आश्चर्यकारक आहे! मग आता…

    Read More

  • The Relative Size of Particles

    When you look around you, what do you see? The world is filled with all sorts of things. Trees, birds, people… The list goes on and on. If you look up at night sky you may see moon, stars and even distant planets. Some of them are million and million miles away. Isn’t it amazing…

    Read More

  • नोबेल पारितोषिक

    नोबेल पारितोषिक १० डिसेंबर या दिवसाला जागतिक स्तरावर फार महत्व आहे कारण या दिवशी निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच संशोधन करणाऱ्या व्यक्तींना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले जाते. काय आहे हा नोबेल पुरस्कार ? हा पुरस्कार केव्हापासून देण्यास सुरुवात झाली आणि ती कोणी केली ? असे काही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. चला तर मग……

    Read More

  • या नावांमागे दडलंय काय?

    हा फोटो बघितला का? लक्षात आले का कसला आहे ते? ही आहे ‘मूलद्रव्यांची आवर्तसारणी’ अर्थात ‘Periodic Table of Elements’. या आवर्तसारणीत माहीत असलेली ११८ मूलद्रव्ये दिसत आहेत. ती त्यांच्या अणुक्रमांकानुसार मांडलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक मूलद्रव्याला त्याच्या गुणधर्मानुसार जागा मिळाली आहे. प्रत्येक चौकटीत मूलद्रव्याचे नाव, त्याची संज्ञा व अणुक्रमांक दिसत आहे. एखाद्या व्यक्तीचे किंवा पदार्थाचे नाव…

    Read More

  • वस्त्रप्रावरणाची निवड व त्यांची योग्य ती देखभाल

    “एकनूर आदमी तो दसनूर कपडा” वरील म्हण आपल्या परिचयाची आहे व आपण त्याचा अनुभव पण घेत असतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडण्यासाठी आपल्याला आपल्या वस्त्रप्रावरणाची निवड व त्यांची योग्य ती देखभाल करणे गरजेचे असते. आज आपण कपडे धुण्याचे शास्त्र व मुख्यतः त्यावरील डाग, धब्बे कसे काढायचे हे बघणार आहोत. कपडे धुण्याची वेळ येईल तेव्हा त्यांची योग्य…

    Read More

  • Nuclear Power

    मुलांनो, तुम्हाला हे माहीतच आहे की आपल्याला रोज ठराविक प्रमाणात जेवावे लागते, कारण आपल्या दिनचर्येतील वेगवेगळी कामे करण्याकरिता आपल्याला जी ऊर्जा लागते ती या अन्नातून मिळते. त्याचप्रमाणे आपल्या वापरातील विविध साधने चालविण्याकरिता पण ऊर्जा लागते. ही ऊर्जा आपल्याला कशी मिळते? घरात लागणारी ऊर्जा आपल्याला दोन प्रकारे मिळते – पण या तारांमध्ये ही वीज येते कुठून?…

    Read More

*प्रत्येक पाठात ८वी ते १०वीचा पूर्ण अभ्यासक्रम एकत्रित घेतला आहे. मुलांनी त्यांना आवश्यक तेव्हढा वाचावा.

Send us your feedback

Kiran Phatak

email: ka704phatak@gmail.com

Vidnyanvahini

Postal Address:

‘Rangdeep’ plot 20, lane 10
Natraj Housing Society
Karvenagar, Pune 411052

    Scroll to Top